top of page
Quill_ink.png

Parent & Visitor Testimonials

Major General

Achyut S Deo

Indian Army Officer (Retd.)

Very well conceived, thought through and implemented [concept of Gurukul education]... I greatly appreciate this fine institute of Gurukul - The Day School... I am also grateful for the hospitality and caring shown to me during the visit. 

Ms. Anupama Parmar

Works at Oxford and Harvard University and as

an advisor with Education Department, Canada

 

I am wholeheartedly impressed and inspired by the vision and dedication to the students' holistic development. Education is the cornerstone of civil and prosperous society and Gurukul - The Day School is one such place towards this.

Mr. N. Krishnamurti 

Vivekananda Kendra, Kanyakumari

It is pleasure to come to Gurukul school and interact with its staff. All new experiments with creativity  are delightful for the children. 

Dr. Anand Nadkarni

Psychiatrist and founder of Institute for Psychological Health (IPH, Thane)

प्रिय गुरुकुल शाळा !

      Love at first sight !

            फार मस्त वाटले.

           

पालक भेटले. शिक्षक भेटले. 

सहा तास कसे गेले कळलंच नाही.

पुन्हा यायचं आहे. 

Mr. Rajiv Tambe

 

Author  (Children's Literature) and 

also worked as Educational Consultant

for UNICEF

अगदी खरं, मनापासून सांगायचं तर,

मला जर पुन्हा लहान होता आलं तर मला या

आणि याच शाळेत यायला आवडेल.

इतकी ही शाळा मला आवडली ही शाळा मला माझी वाटली.

खूप दिवसांनी अशी ‘सर्वार्थानी चांगली शाळा’ पाहून मन भरून गेलं.

Ms. Neelima Mishra

Social worker and winner of

Magsaysay Award

खूप वर्षांनी एवढी सुंदर शाळा बघण्याचा

योग आला.  प्रसन्न वातावरणासोबत, स्वच्छता व टापटीपपणा आहे.

...विद्यार्थ्यांना काहीतरी अर्थपूर्ण देता

येण्यासाठी संस्थाचालक आणि शिक्षकांची

तळमळ बघता आली.

Dr. Vivek Ponkshe

Principal, Dnyana Prabodhini (Pune)

 ...शाळेतील शिक्षकांक्षी बोललो. शिक्षक उत्साही आणि शिकण्यास उत्सुक होते.

...शाळेचा परिसर, इमारत आणि सर्व सुविधा शिकण्यासाठी प्रेरणा निर्माण करणाऱ्या होत्या.

 

शाळा शिक्षणाचा एक नमुनेदार प्रयोग उभा करत आहे. तो यशस्वी होईल यात शंका नाही.

Padmashree Taalyogi

Pt. Suresh Talwalkar

Tabla Maestro

श्री. अजित व सौ. मंगल (गौरी) करकरे यांचे गुरुकुल बघून अतिशय आनंद, समाधान झाले.

 

येथून बाहेर पाडणारा विद्यार्थी समाजात मानाचे स्थान मिळवेल यात शंका नाही, परंतु याच बरोबर संस्कारयुक्त व्यक्तिमत्वात रुपांतर होईल असे वाटते.  

 

 

Mr. Sudhir Joglekar

Editor, Loksatta (Marathi Newspaper)

निर्गुणाकडून सगुणाकडे नेते ते शिक्षण,

      निराकाराकडून सदाकाराकडे नेते ते शिक्षण..

      शिक्षणाची ही संकल्पना व्यवहारात आणि प्रत्यक्षात आणणाऱ्या अनौपचारिक

शैक्षणिक प्रयोग साकारणाऱ्या

‘गुरुकुल डे स्कूल’ चे नाव ऐकले होते,

आज प्रत्यक्ष अनुभूती घेतली.

Mr. Macchindranath Munde

Secretary, Andhashraddha Nirmoolan Samiti

आगळ्या वेगळ्या विचारांना जी इमारत

मुलांना / मुलींना शहाणे करून सोडते, घडवतं

ती शाळा. जी लळा लावते, ती शाळा.

जी सतत शाबासकी मिळविण्यास शिकवते, 

ती शाळा.

अशीच असावी माझी स्वप्नातील शाळा - ती हीच शाळा. फार फार बरं वाटलं.

Shri. Tilak Sir

Professor and Trustee, Saraswati Mandir Trust (Thane)

‘गुरुकुल’ या व्यवस्थेत शिक्षण व विद्यार्थ्यांच्या विविध गुणात्मक विकास याचा उत्तम वेळ बसू लागलेला दिसून येतो.

 

विद्यार्थ्यांना अनुभवातून अनेक गोष्टी सहजपणाने शिकता येतात याचा उत्तम अनुभव या ठिकाणी दिसून येतो.

Mr. Kumar Ketkar

Editor, Loksatta (Marathi Newspaper)

या शाळेला दिलेली भेट हा एक खरोखरच प्रेरणादायक आणि जीवन-आशा जिवंत ठेवणारा अनुभव होता... 

 

...जिद्द व उमेद न हरपता आशावादी दृष्टिकोनातून व गांधीजी, विनोबा,

जे कृष्णमूर्ती यांचे शिक्षण आदर्श ठेवून

ही शाळा चालविली जाते आहे हे पाहून

अतिशय आनंद झाला.

Hon. Ramnath Mote

Member of Legislative Assembly

शाळेत विविध उपक्रम राबविले जात असल्याचे अनुभवास आले.

 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून कल्पकतेने उपक्रमांचे आयोजन

केले जाते. 

‘एक आदर्श शाळा’ म्हणून मुद्दाम उल्लेख करावसा वाटतो. शाळेचा परिसर निसर्गरम्य व स्वच्छ व आरोग्यवर्धक पहायला मिळाला.

Mr. Bagwe

Sarva Shiksha Abhiyan

आज अचानक गुरुकुल शाळेला भेट दिली

आणि संस्थेचे संस्थापक यांच्या

कर्तृत्वाचे ज्वलंत शिक्षणाचा प्रसार आणि

प्रचार याचे खऱ्या अर्थाने बीज रोवत आहेत

याचा आम्हाला अभिमान वाटला...

Prof. Bhagwan Chakradeo

Innovative Physics Learning

...सर्व विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी उच्च

असल्याने विज्ञान-प्रयोग दाखवणे अत्यंत आनंददायी झाले.

...उत्तम प्रतिसाद मिळाला.

     

आपली शाळा खरोखरच “आदर्श” आहे.

Mr. Anil Gawas

Actor

अभिनंदन आपणां उभयतांचे, अत्यंत महत्त्वाच्या आणि माझ्या जिव्हाळ्याच्या विषयातील आपली कामगिरी अतुलनीय आहे.

 

मुळात शाळेची संकल्पना आजच्या शिक्षणपद्धतीला विचार करायला लावणारी आहे. अत्यंत नेटके व्यवस्थापन आणि स्तुत्य उपक्रम.

Shri. Abasaheb Patwari

Social Worker

नव्या जागतिक वातावरणात ही संकल्पना कशाप्रकारे अंमलात आणता येईल याचे आदर्श उदाहरण म्हणजे करकरे कुटुंबियांचे गुरुकुल.

 

प्रकल्प सुचणे आणि प्रत्यक्षात अंमलात आणणे यात फरक आहे.

 

त्यासाठी लागणारे कष्ट अमाप असतात आणि ते उचलण्याचे धनुष्य या दाम्पत्यांने पेलले हे कौतुकाचे.

Mrs. Mangala Nene

Chairperson, Jijau Jyeshtha Nagrik

Mahila Mandal

अशा शाळेला भेट देऊन निदान पुढची पिढी संस्कारक्षम असेलच, पण ती देशासाठी काही चांगले घडवू शकेल असा विश्वास ही शाळा पाहिल्यानंतर होते.

पूर्वीचे ठेऊन त्यास नवीनतेची जोड देणारी ही डोंबिवली मधील आदर्श शाळा.

मुलांवर स्वच्छते पासून ते सेवे पर्यंतचे सर्व संस्कार येथे होतात. त्या मुळे भावी पिढी कुटुंब संभाळेल या विषयी खात्री आहे.

bottom of page